Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अल्पसंख्याक शाळा, महाविद्यालयांना अनुदान



अहमदनगर : अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खासगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगरपरिषद शाळा, दिव्यांग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी व शिक्षकांचे मानधन देण्यासाठी २ लाख रुपये इतके अनुदान देण्यात येते. इच्छुक संस्थांनी सन २०२४- २५ या वर्षासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिकारी दीपक दातीर यांनी केले आहे. योजनेचा लाभ राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असलेल्या मदरसांना दिला जाईल. 

अल्पसंख्यांक समाजाचे (मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, शिख, पारशी व ज्यू) किमान ७० टक्के विद्यार्थी शिक्षण घेत असणे आवश्यक आहे. शासनमान्य दिव्यांग शाळांमध्ये (मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, शिख, पारशी व ज्यू) किमान ५० टक्के अल्पसंख्यांक विद्यार्थी शिक्षण घेत असणे आवश्यक आहे. यामध्ये शाळेच्या इमारतींचे नुतनीकरण व डागडुजी, संगणक कक्ष उभारणे, अद्ययावत करणे, शैक्षणिक कार्यासाठी आवश्यक फर्निचर, इन्व्हर्टरची सुविधा निर्माण करणे, अध्ययनाची साधने आदी पायाभूत सुविधांसाठी अनुदान देण्यात येते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.