Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'लाडकी बहीण' साठी नगर जिल्ह्यात साडेपाच लाख अर्ज



                            अडीच लाख झाले ऑनलाइन : ८० हजार अर्ज नगर शहरातून

अहमदनगर : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेत महिलांकडून अर्ज भरण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. २३ जुलैपर्यंत जिल्ह्यातील साडेपाच लाख महिलांनी हे अर्ज भरले आहेत. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेत जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे यासाठी शासनाने जिल्हा प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. त्याच अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने १२ आणि १३ जुलै रोजी विशेष मोहीम राबवली. यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांनी ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज भरले. जिल्ह्यात ग्रामपंचायत, वाडी वस्ती आणि वॉर्डस्तरापर्यंत शिबिराचे आयोजन केले होते.

विशेष मोहिमेसाठी ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, सेतू केंद्र कर्मचारी आणि नगरपालिकेचे कर्मचारी यांची पथके तयार करण्यात आले होते. जास्तीत जास्त महिलांना अर्ज भरण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. महानगरपालिका, गटविकास अधिकारी, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी आणि नगरपालिका मुख्याधिकारी आदींसह प्रत्येक गावातही ग्रामपंचायत स्तरावर अर्ज भरून घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस अर्जाची संख्या वाढत आहे. १ जुलै ते २३ जुलै या कालावधीत जिल्ह्यात ५ लाख ३९ हजार ८९० अर्ज भरले आहेत. यात ग्रामस्तरावर ४ लाख ५९ हजार ३३७ अर्ज भरले गेले, तर ८० हजार ५५३ अर्ज नागरी क्षेत्रात भरलेले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.