Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

लाच मागणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा



अहमदनगर : फायरिंगच्या गुन्ह्यात  फिर्यादीच्या भावाला अटक न करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागत तडजोडीअंती दीड लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविणाऱ्या पोलिस नाईक विरोधात भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात बुधवारी (दि. २४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक येथील लाचलुचपत - प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. संदीप चव्हाण असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिस

कर्मचाऱ्याचे नाव असून, तो आधी स्थानिक गुन्हे शाखा व सध्या दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत आहे. यातील तक्रारदार यांच्या हॉटेलच्या पाठीमागील भागात असलेल्या पार्किंगमध्ये झालेल्या फायरिंगच्या गुन्ह्यात फिर्यादीच्या भावाला अटक न करण्यासाठी व ताब्यात घेतल्याने सोडून देण्यासाठी चव्हाण याने तक्रारदार यांच्याकडे २२ मार्च रोजी २ लाख रुपयांची मागणी केली होती. याबाबत नाशिक येथे तक्रार केली होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.