Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पवित्र पोर्टलने ३५ शिक्षकांना नियुक्त्या



अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शुक्रवारी पवित्र पोर्टलद्वारे ३५ शिक्षकांना समुपदेशनाने नियुक्त्या दिल्या. दरम्यान, आतापर्यंत १७९ शिक्षकांना पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात समुपदेशनाने या नियुक्त्या देण्यात आल्या. सामान्य प्रशासन विभागाचेउपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील आदींच्या उपस्थितीत ही समुपदेशन प्रक्रिया राबविण्यात आली. 

सन २०२२ मध्ये राज्यात ११ हजार शिक्षण सेवक पदांसाठी पवित्र पोर्टलद्वारे पदभरती प्रक्रिया राबविण्यात आली. यातून फेब्रुवारी २०२४ मध्ये निवड झालेल्या शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. यात नगर जिल्ह्यातून २०६ पदांची यादी प्रसिद्ध झाली होती. त्यातील १४४ शिक्षकांना मार्च २०२४ मध्ये नियुक्त्या देण्यात आल्या, तर ३५ शिक्षकांच्या नियुक्त्या देण्यासाठी शुक्रवारी समुपदेशन प्रक्रिया ठेवली होती. याशिवाय ३ आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांनाही नियुक्त्या देण्यात आल्या. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांत १७९ शिक्षक पवित्र पोर्टलने, तसेच १२८ शिक्षक जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.