Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दप्तराचे ओझे वाढू नये याची दक्षता घ्या



                                                दीपक केसरकर : शिक्षण विभागाची बैठक

पुणे : विद्यार्थ्यांमध्ये गुणात्मक बदल घडवून आणताना त्यांच्या पाठीवर दप्तराचे ओझे वाढणार नाही, तसेच शालेय विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचा पोषण आहार मिळेल याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. राज्य शिक्षण मंडळ कार्यालयात शुक्रवारी शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक झाली. यावेळी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या सहसंचालक शोभा खंदारे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, शिक्षण संचालक महेश पालकर यांच्यासह राज्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक व इतर अधिकाऱ्यांसोबत ऑनलाइन माध्यमातून संवाद साधला.

केसरकर म्हणाले, शालेय विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात आणि शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.कडधान्य, पौष्टिक तृणधान्य आदींचा समावेश करावा. शिक्षणाधिकाऱ्यांनी वारंवार शाळेला भेटी देऊन पोषण आहाराची पाहणी करावी. अधिकाऱ्यांनी शिक्षणाचा दर्जा, गणवेश, दप्तरांचा बोजा, वहीतील कोऱ्या पानांचा उपयोग, पोषण आहार, परसबाग योजना, स्काऊट-गाईड, योजना, स्वच्छतागृह व किचन शेडची वारंवार तपासणी करावी तसेच एकही विद्यार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

दुर्गम भागातील शाळांना उपग्रह कनेक्टिव्हिटी

सर्व शाळांना इंटरनेट जोडणी असावी. जेथे इंटरनेट जोडणी नसेल त्या शाळांनी प्रस्ताव सादर करावेत. दुर्गम भागात उपग्रह कनेक्टिव्हिटी घ्यावी. त्यामुळे शाळेत ऑनलाइन कार्यक्रम राबविणे सोपे जाईल. शिक्षकांनी राबविणे र नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.