Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

श्रीगोंद्यातील पुरातन बालाजी मंदिराचा जीर्णोद्धार



श्रीगोंदा : श्रीगोंदा येथील पुरातन  असलेल्या बालाजी मंदिराचा जीर्णोद्धार व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा काही दिवसांपूर्वी करण्यात आली. तसेच जीर्णोद्धार व संवर्धनाचा मुहूर्त करण्यात आला होता.

२१ जुलै रोजी तिरुपती तिरुमला बालाजी देवस्थानचे ट्रस्टी सौरभ बोरा, डॉ. शैलेश गुजर, प्रशांत सरु यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण सोहळा झाला. नीरा नरसिंगपूर देवस्थानचे ट्रस्टी डॉ. प्रशांत सरू म्हणाले, हे मंदिर अडीचशे वर्षे जुने आहे. मोरेश्वर क्षीरसागर यांनी हे मंदिर बांधले होते. तेव्हाचे शिंदे सरकार म्हणजे जानकोजी शिंदे यांनी त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांना सनद दिली होती. तेव्हापासून साधारण सात ते आठ पिढ्या क्षीरसागर आणि नंतर दीक्षित कुटुंब हे मंदिर सांभाळत आहेत. याप्रसंगी धनंजय झरकर यांच्याकडून महाप्रसाद व उदय कुलकर्णी यांनी लाडू वाटप केले. विकास वैद्य, मनीषा वैद्य, आशिष केसकर व भाग्यश्री केसकर यांच्या भजनाने उपस्थित मंत्रमुग्ध झाले. योगेश कुलकर्णी यांचे कीर्तन झाले, तर आभार ऋग्वेद दीक्षित यांनी मानले. यावेळी प्रसन्न राक्षे, ओंकार खळदकर, नितीन कटारिया, शिवाजी साळुंखे, सागर गोरे, सागर झरकर, अनंत फडणीस, संदीप कुलकर्णी, कृष्ण जोशी, मिलिंद कुलकर्णी, दत्ताजी जगताप, उमेश जाधव, आदित्य पावशे उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.