Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ई-पॉस मशीनमुळे रेशन धारकांना धान्य देण्यास अडचण



 श्रीरामपूर : ई पॉस मशीनचे सर्व्हर सुरळीत काम करीत नसल्यामुळे शहर व तालुक्यातील शासकीय स्वस्त धान्य दुकानातून रेशनिंगचे धान्य मिळण्यात गेल्या ३-४ दिवसापासून अडचण निर्माण झाली आहे. कार्डधारकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. धान्य दुकानदार संघटनेने ई- पॉस मशीन सर्व्हर चालत नसल्याचे निवेदन तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना दिले आहे. श्रीरामपूर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना गेल्या महिन्यापासून मोफत धान्य लाभार्थी रेशन कार्डधारकांच्या प्रत्येक सदस्याने ई- पॉस मशीनवर कुटुंबाची ईकेवायसी करण्याचे आदेश दिले आहेत. हे काम दुकानदारांनी सुरू केले. परंतु मशीनबाबत अनेक अडचणी येत आहेत. नवीन व्हर्जनमुळे प्रत्येक वेळी पासवर्ड टाकावा लागत आहे. पासवर्ड टाकण्याची अट शासनाने रद्द करावी, अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदारांनी केली असल्याचे अध्यक्ष देवीदास देसाई यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.