Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

टपाल विभागाचा डाक चौपाल हा अभिनव उपक्रम वाघ : नगरपरिषद; योजनांबाबत माहिती



संगमनेर : भारतीय टपाल विभागाचा डाक चौपाल हा अभिनव उपक्रम आहे. टपाल विभागाच्या जनकल्याणकारी योजना संगमनेर शहरातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संगमनेर नगर परिषद सदैव कटिबद्ध आहे, असे नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल वाघ म्हणाले.

मंगळवारी (दि. २३) संगमनेर मुख्य डाकघर आणि संगमनेर नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने नगर परिषदेच्या सभागृहात डाक चौपाल या उपक्रमाचे अयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, बँक खाते, बालआधार, आधार मोबाइल लिंकिंग, अपघाती विमा, महिला सन्मान बचत पत्र, सुकन्या समृद्धी योजना, ज्येष्ठ नागरिक योजना, टपाल जीवन विमा आदी सुविधा देत त्यासंदर्भाने अधिक माहिती देण्यात आली, यावेळी ते बोलत होते. नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी संजय पेखळे, कार्यालयीन निरीक्षक राजेश गुंजाळ, श्रीरामपूर डाक विभागाचे अधीक्षक हेमंत खडकीकर, सहायक अधीक्षक, मुख्यालय संतोष जोशी, संगमनेरचे सहायक अधीक्षक रविकुमार झावरे, उपडाकपाल महेश कोबरणे, विपणन अधिकारी अमित देशपांडे, रोखपाल अमोल गवांदे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.