Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राज्यातील 'नीट'चा निकाल नीटच


लातूरसह सर्व प्रमुख केंद्रांवरील निकालाचा आलेखही पूर्वीप्रमाणेच चढता

 लातूर : राज्यातील विविध जिल्ह्यांत परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या यापूर्वीच्या व आताच्या निकालात तफावत नसल्याचे 'नीट'च्या केंद्र आणि शहरनिहाय निकालातून दिसून येते. शिवाय लातूर, मुंबई, पुणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नागपूर केंद्रांवरील निकालाचा आलेखही पूर्वीप्रमाणेच चढता आहे, असे अभ्यासकांनी सांगितले

सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

नवी दिल्ली: वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा 'नीट' पेपरफुटीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी विविध याचिकांवर महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. त्यात न्यायालय 'नीट' परीक्षा नव्याने घेण्याचे आदेश देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी करण्यात येत आहे. त्यात देशभरातील उच्च न्यायालयांत दाखल याचिका सर्वोच्च न्यायालयात हस्तांतरीत करण्याची विनंती करणाऱ्या याचिकेचा समावेश आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होईल

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.