Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर लाखो भाविकांचे साईदर्शन


शिर्डी गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साईबाबांना गुरुस्थानी मानणाऱ्या लाखो भाविकांनी साईसमाधीवर नतमस्तक होत बाबांना श्रद्धासुमने अर्पण केली. पुणे, गोवा, आदी ठिकाणांवरून पालखी घेऊन आलेल्या पदयात्रींनी शिर्डी फुलून गेली गुरुपौर्णिमेनिमित्ताने भजन, कीर्तन, साईधाबांची गाणी अशा विविध कार्यक्रमांचे संस्थानने आयोजन केले होते. उत्सवाच्या मुख्य दिवशी द्वारकामाईत सुरू असलेल्या साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. या निमित्ताने साईप्रतिमेची व पोथीची द्वारकामाई मंदिरातून मिरवणूक काढण्यात आली, यात जिल्हा प्रधान न्यायाधीश तथा संस्थानचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा यांनी पोथी, संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी विणा, तर संरक्षण अधिकारी रोहिदास माळी व इंग्लिश मीडियमचे प्राचार्य आसीफ तांबोळी यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला. यावेळी डेप्युटी सीईओ तुकाराम हुलवळे, मंदिर विभाग प्रमुख विष्णु थोरात, जनसंपर्क

अधिकारी तुषार शेळके, आस्थापना प्रमुख रामदास कोकणे, मंदिर पुजारी, ग्रामस्थ व भविक उपस्थित होते. सकाळी संस्थानचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा व मालती यार्लगड्डा यांनी सपत्नीक समाधीमंदिरात श्रींची पाद्यपूजा केली. उत्सवानिमित्त विविध  गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त रविवारी (दि. २१) दिवसभर नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथे लाखो भाविकांनी भगवान दत्तात्रयांचे दर्शन घेतले. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या गजराने देवगडनगरी दुमदुमली.

श्री गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या आयोजित कीर्तन सोहळ्याला उच्चांकी गर्दी होती. पहाटेच्या सुमारास भगवान दत्तात्रय, श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या समाधीस अभिषेक घालण्यात आला.राज्यभरातून आलेल्या भाविकांनी गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुवर्य भास्करगिरीमहाराजांसह उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांचे संतपूजन केले. यावेळी झालेल्या महाआरतीच्या प्रसंगी देवगडचे दत्तमंदिर प्रांगण हजारो भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. मंदिर प्रांगणात विविध दुकाने मोठ्या प्रमाणात थाटल्याने यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.भास्करगिरी महाराज म्हणाले, श्री समर्थ सद्‌गुरू किसनगिरी बाबांनी गुरुदेव दत्त पिठाची निर्मिती करताना अनवाणी पायाने फिरले. त्यांनी यासाठी फार कष्ट सोसले. त्यांनी देवगड येथे गुरुदेव दत्तपीठ सर्वांच्या सुखासाठी व मानवजातीच्या उद्धारासाठी निर्माण केले आहे. त्यांनी दिलेल्या विचारांचे पालन करणे हेआपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. गुरूंचा महिमा व लीला अगाध आहे. संत है जगाचे कृपाळू मायबाप आहेत, गुरुंबद्दल असलेला भक्ती भाव, श्रद्धेला शेवटच्या श्वासापर्यंत जपा, असे आवाहन त्यांनी केले.

या प्रसंगी भास्करगिरी बाबांच्या मातोश्री सरूबाई पाटील, स्वामींच्या मातोश्री मीराबाई मते, युवा नेते उदयन गडाख, बजरंग विधाते, सरपंच अजय साबळे यांच्यासह लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.देवगडचे मुख्य प्रवेशद्वार, श्री सिद्धेश्वर मंदिर, श्री समर्थ सद्‌गुरु किसनगिरी बाबा समाधी मंदिर या ठिकाणी भाविकांची गर्दी होती.सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रात्री सव्वानऊ वाजता सुवर्ण स्थातून साईप्रतिमेची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत साईभक्त, ग्रामस्थ आणि बँडपथके मोठ्या संख्येने सहभागी झाले. 


कलाकारांनी दिली हजेरी

रात्रभर समाधी मंदिरासमोरील स्टेजवर विविध कलाकारांनी हजेरी दिली. मंदिर रात्रभर दर्शनाकरिता खुले असल्यामुळे लाखो भाविकांनी सर्व्हसमाधीच्या दर्शनाचा लाभ घेतला, उत्सवाच्या सांगता दिनी, सोमवारी समाधिमंदिरात पाद्यपूजा व गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक होणार आहे. यानंतर वैभव ओक यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता होईल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.