Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने मिळवले पहिले पदक मनू भाकरचा कांस्य नेम

  


पॅरिस : यंदाच्या ऑलिम्पिकचे सीन नदीद्वारे ऐतिहासिक उद्घाटन झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी भारताच्या पदक खात्याचा श्रीगणेशा झाला. नेमबाज मनू भाकरने १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. यांसह, ऑलिम्पिक पदक जिंकणारी मनू पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली.

आठ नेमबाजांच्या अंतिम फेरीत मनूने २२१.७ गुणांचा वेध घेत तिसरे स्थान पटकावले. जिन ओह आणि येजी किम या दक्षिण कोरियन नेमबाजांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदक पटकावले. जिन ओह हिने ऑलिम्पिक विक्रमाची नोंद करत सुवर्णपदक जिंकले तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनूला फोन करून तिच्या यशाबद्दल अभिनंदन केले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.