Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी ३० ऑगस्टला


अहमदनगर : राज्य निवडणूकआयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक विभागाला मतदार यादी कार्यक्रम दिला आहे. यानुसार शुक्रवारी जिल्ह्यातील प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात येणार होती; परंतु यादी प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. आता मंगळवारी (६ ऑगस्ट) ही प्रसिद्ध होणार असून अंतिम मतदार यादी ३० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

विधानसभा निवडणुकीत मतदार केंद्रावर सुसूत्रता आणण्यासाठी २५ जून ते ५ ऑगस्ट दरम्यान सुसूत्रीकरण कार्यक्रम राबविण्यात आला. यानुसार जिल्ह्यात नव्याने ३२ मतदार केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. संगमनेर १०, नेवासा ६, शेवगाव ३, पारनेर १, नगर शहर ११ आणि श्रीगोंदा १ अशी ३२ मतदान केंद्रे नवीन अस्तित्वात येणार आहेत.

६ ऑगस्ट रोजी प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर २० ऑगस्टपर्यंत मतदार यादीवर हरकती घेता येणार आहेत. यानंतर २० ते २९ ऑगस्ट दरम्यान या अर्जावर निर्णय घेण्यात येऊन ३० ऑगस्ट रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

३० ऑगस्टला अंतिम मतदार यादी

विधानसभा निवडणुकीसाठी छायाचित्रासह मतदार यादीचा सुधारित द्वितीय विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे. त्यानुसार आता अंतिम मतदार यादी ३० ऑगस्टला जाहीर होणार आहे. यापूर्वीच्या कार्यक्रमात अंतिम मतदार यादी २७ ऑगस्टला जाहीर होणार

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.