Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

प्रो-कबड्डी लीगमध्ये नगरच्या खेळाडूंचा दबदबा



 अहमदनगर : प्रो-कबड्डी लीगच्या ११ व्या पर्वासाठी एकाच जिल्हा संघातील विक्रमी सहा खेळाडूंची निवड निश्चित झाली आहे. येणाऱ्या काळात आणखी दोन ते तीन खेळाडूंची निवड होण्याची शक्यता आहे. यामुळे यंदाच्या प्रो- कबड्डी लीगमध्ये नगरच्या खेळाडूंचा दबदबा असणार आहे. तसेच बोधगया येथे झालेल्या राष्ट्रीय बीच कबड्डी स्पर्धेत शंकर गदाईने उत्कृष्ट प्रदर्शन करत संभाव्य भारतीय संघात स्थान मिळवले आहे.

नुकत्याच १५ ते २० जुलै २०२४ दरम्यान बालेवाडी पुणे येथे पार पडलेल्या ७१ व्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत अहमदनगरच्या पुरुष संघाने बलाढ्य संघांना लढत देऊन सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली होती.

मागील काही वर्षांमध्ये सलग तीन वर्षे अंतिम फेरीत खेळण्याचा मान अहमदनगर जिल्हा संघाने मिळवला होता. यापैकी एकदा विजेतेपद आणि दोन वेळा उपविजेतेपद मिळाले होते. यातून मागील दोन्ही वर्षे जिल्ह्याचे तीन खेळाडू राज्य संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. यावर्षीच्या राज्याच्या संभाव्य

संघाच्या सराव शिबिरासाठी विक्रमी सात खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.या सर्व खेळाडूंना राज्य मार्गदर्शक शंतनू पांडव, परशुराम नाकाडे, विनायक भुतकर तसेच निवड समिती सदस्य प्रा. बाळासाहेब कडूस, प्रा. सोपान काळे, माजी जिल्हा क्रीडा अधिकारी अजय पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

जिल्हा संघटनेचे अध्यक्ष खासदार नीलेश लंके, सचिव प्रा. शशिकांत गाडे, जयंत वाघ, संजय फडके, प्रकाश बोरुडे, विजयसिंह मिस्कीन, सुधाकर सुंबे, पोपट कडूस, कैलास पठारे, जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, ज्ञानेश्वर खुरंगे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.


प्रो-कबड्डीसाठी निवड झालेले खेळाडू

• तेलुगू टायटन्स - शंकर गदई, अजित पवार, प्रफुल्ल झावरे • पुणेरी पलटण- आदित्य शिंदे हरियाणा स्टिलर्स - शिवम पटारे बंगाल वॉरियर संभाजी वाबळे


शिबिरासाठी सात खेळाडूंची निवड

शंकर गदई, राहुल खाटीक, अजित पवार, संभाजी वाबळे, शिवम पटारे, प्रफुल्ल झावरे, सौरभ राऊत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.