Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फास्ट ट्रॅक कोर्ट नको, आरोपीला आजच भरचौकात फाशी द्या”

 

 बदलापूर स्थानकात आंदोलकांच्या मागणीला जोर!

बदलापूरमधील आदर्श शिक्षण संस्थेच्या शाळेत १३ ऑगस्ट रोजी दोन लहान मुलींवर शाळेतील शिपायाकडून लैंगिक अत्याचार  झाला. सदर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडून दिरंगाई केली गेली. त्यानंतर संतापलेल्या पालकांनी आज बदलापूर रेल्वे स्थानक आणि आदर्श शाळेच्या बाहेर आंदोलन सुरू केले. सकाळी दहा वाजल्यापासून हे रेल्वे स्थानकावर आंदोलन सुरू असून यामुळे बदलापूर ते कर्जत लोकलसेवा ठप्प झाली आहे. दरम्यान, आंदोलक क्षणाक्षणाला आक्रमक होत असून आरोपीला आत्ताच भरचौकात फाशी द्या, अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

रेल्वे स्टेशनवर आंदोलनकर्त्यांनी रेल रोको केल्याने वांगणी ते कर्जत, खोपोली या भागातून ठाणे, मुंबईच्या दिशेने येणाऱ्या नोकरदारांना कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही. सकाळी आंदोलन तीव्र झाल्याने बदलापूर पल्ल्याड नागरिकांनी घरातून काम करण्याचा निर्णय घेतला. रेल्वे प्रशासनाने अंबरनाथ ते सीएसएमटी पर्यंत उपनगरीय रेल्वेगाड्यांची वाहतूक सुरू ठेवली होती. तर कर्जत मार्गे जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांची वाहतूक पनवेल मार्ग वळविण्यात आली. दुपारनंतरही हा रेल रोको कायम होता. त्यामुळे काही रेल्वेगाड्या रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


या प्रकरणात आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरोल म्हणून सरकारने हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टाच चालवण्याचं आश्वासन दिलं. आम्ही रस्त्यावर उतरलो नसतो तर हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात गेलं असतं का? इतर राज्यात जे घडतं ते आम्हाला आमच्या राज्यात घडवायचं नाही. त्यामुळे या प्रकरणी आम्ही सरकारला फक्त सात दिवसांची मुदत देतोय. आम्ही सात दिवस इथून हलणार नाहीत, असं एका आंदोलनकर्त्याने म्हटलं


तर, “आम्हाला आता आमच्या मुलींना बाहेर सोडायची भीती वाटतेय. शाळेत सोडायची भीती वाटते. आम्हाला सुरक्षेची चिंता आहे. त्यामुळे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टातही नको, सात दिवसांची मुतदही नको. आजच आरोपीला भरचौकात फाशी द्या”, अशी संतप्त प्रतिक्रिया एका महिला आंदोलनकर्त्याने दिली.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.