अहमदनगर : मागील काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात जोरदार पावसाचे आगमन झाले आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस अहमदनगर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. घराबाहेर पडताना नागरिकांनी खबरदारी घ्यावी. स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष राहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासून तसेच ओढे व नाले यांपासून दूर राहावे व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा ओढे, नाल्यांवरील पुलांवरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.