Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आरटीई प्रवेश प्रक्रियेला ५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ



जिल्ह्यात २९०१ पैकी १७५१ प्रवेश निश्चित

अहमदनगर : यंदा आरटीई प्रवेशाला विलंब झाल्याने प्रवेश प्रक्रिया उशिराने सुरू झाली. परिणामी, पालकांचा प्रतिसाद कमी मिळत असल्याने प्रवेश घेण्याला ५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांची नावे लॉटरीच्या यादीत आहेत, त्यांनी उर्वरित दोन दिवसांत प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. शिक्षण विभागाने फेब्रुवारीमध्ये

आरटीई प्रवेश प्रक्रियेत केलेल्या बदलांच्या विरोधात सामाजिक संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. हे न्यायालयीन प्रकरण सुमारे दोन महिने सुरू होते. अखेर शिक्षण विभागाने केलेला बदल न्यायालयाने घटनाबाह्य ठरवला. त्यामुळे शिक्षण विभागाला पूर्वीप्रमाणेच आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवावी लागत आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुमारे दोन महिने चालल्याने यंदा प्रवेश प्रक्रियेला विलंब झाला आहे. या काळात पालकांनी मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी त्यांचे प्रवेश खासगी शाळांमध्ये शुल्क भरून केले. त्यामुळे आता आरटीईतून प्रवेश घेण्यास पालक पुढे येताना

दिसत नाहीत. आरटीईमध्ये नगर जिल्ह्यात एकूण ३५७ खासगी शाळांत प्रवेश होणार असून त्यासाठी ३ हजार २६ जागा आहेत. यासाठी जिल्ह्यात एकूण ९ हजार ६२६ अर्ज दाखल झाले होते. त्यातून २ हजार ९०१ मुलांची प्रवेश यादी लॉटरीद्वारे काढण्यात आली. शिक्षण विभागाने प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी २३ ते ३१ जुलैपर्यंतची मुदत दिली होती. या मुदतीत नगर जिल्ह्यात १७५१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. तर कागदपत्र पडताळणीत ९ अर्ज बाद झाले. अजून ११४१ मुलांचे प्रवेश निश्चित होणे बाकी आहे. या मुलांना प्रवेश घेता यावा म्हणून ५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापुढे मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे शिक्षण संचालक कार्यालयाने कळविले आहे.


जिल्ह्यातील आरटीईचे चित्र

एकूण प्रवेशपात्र शाळा - ३५७ एकूण अर्ज - ९६२६ लॉटरीतून निवड झालेले - २९०१

• २ ऑगस्टपर्यंत झालेले प्रवेश - १७५१ पात्र अर्ज - ९

• न झालेले प्रवेश ११४१

प्रवेशाची अखेरची तारीख - ५ ऑगस्ट

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.