Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्वातंत्र्य दिनी ८१ जणांचे रक्तदान



श्रीगोंदा : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून श्रीगोंदा येथील शनी मंदिरात श्री स्वयंभू युवा प्रतिष्ठान आणि • शनी मारुती मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात ८१ जणांनी रक्तदान केले.. शिबिराचे उद्घाटन शनी मारुती देवालय ट्रस्टचे अध्यक्ष राणा खेतमाळीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना उपनेते साजन पाचपुते, बेलवंडीचे सरपंच ऋषिकेश शेलार, सुवर्णा पाचपुते तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शैला डांगे, पिनू काळे, संतोष खेतमाळीस सुधीर खेडकर, एम. डी. शिंदे, राजू गोरे, सतीश बोरुडे, प्रवीण काळे, सोहेल शेख, गफार पठाण, कृष्णा जगताप आदी उपस्थित होते. - प्रास्ताविक सौरभ राऊत यांनी केले.. - सूत्रसंचालन रोहन क्षीरसागर यांनी - केले. सागर नगरे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.