Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नवोदय प्रवेश परीक्षा अर्ज प्रक्रिया सुरू



टाकळी ढोकेश्वर : २०२४-२५ याशैक्षणिक वर्षात पाचवीमध्ये शिकत असलेल्या व पुढील वर्षी सहावीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथील जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी अखिल भारतीय स्तरावर प्रवेश परीक्षा अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ सप्टेंबर आहे.

जवाहर नवोदय विद्यालय हे केंद्र शासन अंतर्गत कार्यरत आहे. हे संपूर्ण निवासी विद्यालय आहे. जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेचे अर्ज करताना विद्यार्थी पाचवीमध्ये शिकत असावा. प्रवेश परीक्षेची प्रक्रिया ऑनलाईन असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ सप्टेंबर आहे. पुढील २०२५-२६ शैक्षणिक वर्षात सहावीसाठी प्रवेश परीक्षा १८ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे. तसेच अधिक माहितीसाठी जवाहर नवोदय विद्यालयात संपर्क करावा किंवा संकेतस्थळावर माहिती घेऊन अर्ज करावा, असे आवाहन प्राचार्य एस. पी. बोरसे यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.