Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आई, भावाच्या कष्टाचे चीज; सोहन झाला पीएसआय

 


जवळा : जामखेड तालुक्यातील जवळा येथील माजी सैनिकाचा मुलगा सोहन चांगदेव हजारे याने पोलिस उपनिरीक्षकपदाच्या (पीएसआय) परीक्षेत यश मिळविले. वडिलांच्या निधनानंतर आईने व मोठ्या भावाने केलेल्या कष्टाचे मुलाने चीज केले, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.सोहन याचे वडील भारतीय सैन्यात होते. सोहन दहा वर्षांचा असतानाच वडील चांगदेव हजारे यांचे अपघाती निधन झाले.

 त्यानंतर आई मंगल हिने मोठ्या कष्टाने मोठी मुलगी शीतल, मुलगा पवन, सर्वांत लहान मुलगा सोहन या तिघांनाही चांगल्या प्रकारचे शिक्षणदिले. सोहन याचे प्राथमिक शिक्षण हे जामखेड तालुक्यातील जवळागावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. बारावीपर्यंतचे शिक्षण धाराशिव जिल्ह्यातील परंडा शहरात झाले. पदवीचे शिक्षण त्याने पुण्यातील अण्णासाहेब मगर कॉलेजमध्ये पूर्ण केले.त्याने वाणिज्य शाखेतून पदवी घेतल्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. तो परीक्षेची तयारी करत असताना मोठा भाऊ पवन आर्थिक व मानसिक पाठबळ देऊन खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभा राहिला. सोहनने आईच्या व भावाच्या कष्टाची जाण ठेवून हे यश मिळविले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.