Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पहिली राखी देशाच्या जवानांसाठी



अहमदनगर : रक्षाबंधनानिमित्त कानडेपरिवाराच्या वतीने पहिली राखी देशाच्या जवानांसाठी उपक्रम राबवून एमआयआरसीतील रक्षाबंधन साजरे केले. जवानांसोबत शहराजवळ असलेल्या एमआयआरसी सेंटरमध्ये सुरेखा कानडे यांनी सैनिक बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष कानडे, सोहम कानडे आदी कानडे परिवारातील सदस्य उपस्थित होते. सुरेखा कानडे म्हणाल्या की, देश रक्षणाच्या कर्तव्यावर असलेल्या सैनिकांना अनेक सण-उत्सव साजरे

करता येत नाहीत. सण-उत्सव काळात ते कुटुंबापासून लांब असतात. त्यांना कुटुंबाची कमतरता भासू नये, म्हणून त्याच आपुलकी व जिव्हाळ्याने रक्षाबंधनाचा सण त्यांच्यासमवेत साजरा करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. संतोष कानडे यांनी सैनिक देत असलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.