Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची गर्दी



जवळे : पारनेर तालुक्यातील जवळे येथील सिद्धेश्वर ओढ्यालगत असलेल्या पुरातन काशी विश्वेश्वर मंदिर येथे श्रावणातील पहिल्या सोमवारी भाविकांनी गर्दी केली होती.

येथील काशी विश्वेश्वर मंदिराची सोमवंशी जहागीरदार यांनी स्थापना केली आहे. काशी येथील महादेव मंदिरासारखेच हे मंदिर आहे. महादेवाची पिंडही तशीच आहे. त्यामुळे काशी विश्वेश्वर म्हणून मंदिर परिचित आहे. बाळासाहेब महाराज पठारे याबाबत म्हणाले, जवळे येथील सोमवंशी जहागीरदार घराण्यातील पूर्वजांनी काशी येथील मंदिराची प्रतिकृती व महादेवाच्या पिंडीची प्रतिकृती स्थापना केली. त्यामुळे जे भाविक बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊ शकत नाहीत ते भाविक येथे येतात.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.