श्रीगोंदा : येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयांमध्ये १६ ऑगस्ट रोजी आयोजित तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचा आखाडा जोरदार रंगला होता. यातील ११ मल्लांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या स्पर्धेचे उद्घाटन आमदार बबनराव पाचपुते यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य बाबासाहेब भोस, श्रीगोंदा क्रीडा समितीचे अध्यक्ष सचिन जामदार, उपप्राचार्य डॉ. प्रकाश साळवे, प्रा. शहाजी मखरे, प्रा. सुदाम भुजबळ, प्रा. संजय अहीवळे, रामदास फटाकडे, संदीप घावटे, राजेंद्र जामदार, अजय गाडेकर, अंकुश जामदार, महेश गिरमकर, रवी काळाणे, चंद्रकांत राहिंज, देवराम दरेकर, राजेंद्र बारगुजे कल्पक राऊत, तुषार नागवडे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक प्राचार्य डॉ. महादेव जरे यांनी केले. सूत्रसंचालन संदीप दरेकर यांनी केले. आभार सचिन झगडे यांनी मानले. स्पर्धेसाठी राष्ट्रीय पंच गणेश जाधव, क्रीडा शिक्षक रोहन रंधवे, संदीप घावटे, अनमोल बेंदरे यांनी पंच म्हणून काम केले. खेळाडूंना क्रीडा शिक्षक संजय डफळ, संतोष जाधव यांचे मार्गदर्शन मिळाले. स्पर्धेत विविध वयोगटातून गायत्री हराळ, सोनाली दरेकर, समीक्षा टोणगे, कामिनी देविकर, श्रुतिका पवार, संदीप गायकवाड, संदेश डफळ, अभिजित शेळके, राज क्षीरसागर, सार्थक काळे, अशोक पालवे या स्पर्धकांनी प्रथम क्रमांक मिळविला असून, त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली