Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हौदात बुडून तीनवर्षीय मुलाचा मृत्यू



मुकुंदनगर येथील घटना: भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा

 अहमदनगर : गल्लीत खेळत असताना हौदात पडून एका तीनवर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना मुकुंदनगर परिसरातील साजीनगर येथे रविवारी (दि. ४) साडेचार वाजेच्या सुमारास घडली. समर इम्रान शेख (वय ३ वर्षे, रा. साजीनगर, मुकुंदनगर), असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता १०५, १२५ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

अल्ताफ शफी सय्यद असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे. याबाबत इम्रान महंमद शफी शेख यांनी फिर्याद दिली आहे. मयत मुलगा खेळत असताना आरोपीच्या दुकानासमोर असलेल्या हौदाजवळ गेला. हौदावर झाकण नसल्याने मुलगा हौदात पडला. हौद पाण्याचे भरलेला होता. बराचवेळ झाला तरी मुलगा घरी आला नाही. त्यामुळे नातेवाइकांनी शोध घेतला असता मुलाचा मृतदेह हौदात मिळून आला. यावेळी नातेवाइकांसह मोठा जमाव जमला होता. हौद उघडा ठेवल्याने मुलाचा मृत्यू झाल्याने संबंधितावर कारवाईची मागणी केली. भिंगारचे सहायक पोलिस निरीक्षक योगेश राजगुरू यांनी भेट दिली

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.