Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

एनसीसीमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी मेजर जनरल योगेंद्र सिंग : १७ महाराष्ट्र बटालियनचे एनसीसी शिबिर


अहमदनगर : राष्ट्रीय पातळीवरपंतप्रधान ध्वज व महाराष्ट्रालासर्वोत्कृष्ट बनवण्यामध्ये प्रत्येक छात्रसैनिक, एनसीसी अधिकारी, लष्करी अधिकारी व महाराष्ट्र सरकारचे महत्त्वाचे योगदान आहे. एनसीसीमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानावर असल्याचे गौरवोद्‌गार महाराष्ट्र राज्याचे एनसीसी प्रमुख मेजर जनरल योगेंद्र सिंग यांनी व्यक्त केले. १ ऑगस्ट रोजी नगर येथील एसीसी अॅण्ड एस येथे सुरू असलेल्या १७ महाराष्ट्र बटालियन एनसीसी शिबिरात मेजर जनरल योगेंद्र सिंग छात्रांना संबोधित करताना बोलत होते. या ठिकाणी अमरावती, औरंगाबाद, पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर अशा संपूर्ण महाराष्ट्रातून छात्रसैनिक ऑल इंडिया थल सैनिक कॅम्प निवड शिबिरासाठी आले आहेत. यामधून राष्ट्रीय पातळीवर एक संघ निवडला जाणार आहे, याची जबाबदारी ब्रिगेडियर ओझा व अन्य अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे.

शिबिरामध्ये पाचशे एनसीसी सैनिकांनी सहभाग नोंदविला छात्र आहे. महाराष्ट्राला सातत्याने मिळणारे प्राईम मिनिस्टर बॅनर हे अत्यंतयेथील एसीसी अॅण्ड एस येथे सुरू असलेल्या १७ महाराष्ट्र बटालियनच्या एनसीसी शिबिरात मेजर जनरल योगेंद्र सिंग यांनी छात्रांना मार्गदर्शन केले. प्रतिष्ठेचे आहे. प्रत्येक छात्रसैनिकाने जबाबदारीने व कर्तव्यनिष्ठने एनसीसीत योगदान दिले तर एनसीसीमध्ये महाराष्ट्र सातत्याने देशात प्रथम क्रमांकावर राहील, असे गौरवोद्‌गार मेजर जनरल योगेंद्र सिंग यांनी काढले. एनसीसीचे फायदे, साहसी अभियान व भविष्यातील संधी यावर त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी एनसीसी अधिकारी व कॅडेट यांच्याशी संवाद साधला.

यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आले. ब्रिगेडियर ओझा, कर्नल चेतन गुरबक्ष, ले. कर्नल रणदीप सिंग, मेजर डॉ. संजय चौधरी, चीप ऑफिसर भाऊसाहेब शिंदे व अन्य एनसीसी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.