Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संगमनेरातील ९ गावांमध्ये होणार अभ्यासिका, ग्रंथालय


 संगमनेर : तालुक्यातील ९ गावांमध्ये अभ्यासिका, ग्रंथालय साकारण्यात येणार आहेत. त्याकरिता ३ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. काँग्रेस नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण करताना तालुक्याला विकासातून गौरवशाली बनवले. वाचन संस्कृती वाढीस लागावी, याकरिता युवा संवाद केंद्र अभ्यासिका ग्रंथालय आणि ई- लायब्ररी उभारण्यात येणार आहे. 

संगमनेर खुर्द, चंदनापुरी, धांदरफळ बुद्रुक, समनापूर, कोकणगाव, राजापूर, डोळासणे, तळेगाव दिघे, नान्नज दुमाला, डिग्रस, निमगाव बुद्रुक व वेल्हाळे येथे युवा संवाद केंद्र अभ्यासिका ग्रंथालय आणि ई- लायब्ररीसाठी प्रत्येक ठिकाणी ३० लाख रुपये, असे एकूण ९ गावांतील लायब्ररीसाठी ३ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.