Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

लाडकी बहीण' योजनेविरोधातील याचिका फेटाळली



 मुंबई : 'लाडकी बहीण योजना' महिलांसाठी लाभदायक असून, ती भेदभाव करणारी नाही, असे निरीक्षण नोंदवीत उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या या योजनेला आव्हान देणारी याचिका सोमवारी फेटाळली.

नावीद अब्दुल सईद मुल्ला यांनी 'लाडकी बहीण'ला आव्हान दिले होते. सरकारने कोणत्या पद्धतीने योजना आखाव्यात, हे न्यायिक कार्यक्षेत्राच्या बाहेर आहे, असे नमूद करत मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाने मुल्ला यांची याचिका फेटाळली

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.