Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आता प्रभाग कार्यालयातून विवाह, जन्म-मृत्यूचे दाखले


अहमदनगर : नागरिकांना विवाहनोंदणी प्रमाणपत्र तसेच जन्म-मृत्यूचे दाखले वेळेत मिळावेत तसेच ही सेवा सुलभरीत्या व्हावी, यासाठी प्रभाग कार्यालयातही हे दाखले दिले जाणार आहेत. प्रभाग क्रमांक १ मध्ये मुकुंदनगर नागरी आरोग्य केंद्र येथे डॉ. नलिनी थोरात, प्रभाग क्रमांक ३ मध्ये झेंडी गेट येथील जिजामाता आरोग्य केंद्रात डॉ. आयेशा शेख तर प्रभाग क्रमांक ४ मध्ये केडगाव आरोग्य केंद्र येथे डॉ. गिरीश दळवी यांच्याकडे विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

जन्म-मृत्यूच्या दाखल्यांसाठी प्रभाग १ मध्ये सावेडी येथे नीलेश सुद्रिक, प्रभाग क्रमांक २ मध्ये माळीवाडा येथे पोपट वायाळ, प्रभाग ३ मध्ये झेंडीगेट येथे शीतल भिंगारदिवे तर प्रभाग ४ मध्ये भोसले आखाडा येथे वंदना भोंडे यांची जन्म-मृत्यू लिपिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी आता विवाह नोंदणी तसेच जन्म- मृत्यूच्या दाखल्यासाठी एकाच ठिकाणी गर्दी न करता आपल्या प्रभागातच संपर्क करावा, असे आवाहन मनपा आयुक्त यशवंत डांगे व आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.