Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

श्रीसाईसंस्थान कर्मचारी सोसायटी विमा उतरवणार



कार्यालयाची इमारत बांधण्याचाही निर्णय

 शिर्डी : श्रीसाईबाबा संस्थान कर्मचारी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यात अनेक सभासदाभिमुख निर्णय घेण्यात आले साईसंस्थान कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय झालेल्या या सभेचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष विठ्ठलराव पवार यांनी भूषविले या वेळी उपाध्यक्ष पोपटराव कोते, संचालक महादू कांदळकर, कृष्णा आरणे, भाऊसाहेब कोकाटे, संभाजी तुरकणे, देविदास जगताप, विनोद कोते, मिलिंद दुनबळे, तुळशीराम पवार, रवींद्र गायकवाड, भाऊसाहेब लवांडे, इकबाल तांबोळी, गणेश अहिरे, सुनंदा जगताप, लता बारसे, रंभाजी गागरे, भाऊसाहेब लबडे, संस्थेचे सचिव नबाजी डांगे, सहसचिव विलास वाणी तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अध्यक्ष पवार यांनी संस्थेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला आणि साईसंस्थानच्या तदर्थ समितीचे अध्यक्ष, जिल्हा प्रधान न्यायाधीश सुधाकर यार्लगडा, जिल्हाधिकारी  सिद्धाराम सालीमठ, सीईओ गोरक्ष गाडीलकर, डेप्युटी सीईओ तुकाराम हुलवळे, सर्व प्रशासकीय अधिकारी, विभागप्रमुख यांचेही सहकार्याबद्दल आभार मानले सचिव नबाजी नामदेव डांगे पाटील यांनी विषयपत्रिका वाचून दाखवली. सभासदांनी सर्व विषयांवर सविस्तर चर्चा केली आणि बहुमताने सर्व प्रस्ताव मंजूर केले.

या वेळी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले यात संस्थेसाठी शिर्डी शहरात एक नवे, आधुनिक कार्यालय बांधण्याचा निर्णय बहुमताने घेण्यात आला याला प्रतापराव कोते यांच्यासह पाच जणांनी विरोध दर्शवला, सभासदांना १५ टक्के लाभांश आणि ठेवींवर ९ टक्के व्याज देणे, सर्व सभासदांचा नैसर्गिक मृत्यूचा विमा उतरवण्यात येणार आहे यात पन्नास टक्के हप्ता संस्था तर पन्नास टक्के सभासद भरणार आहेत सर्व सभासदांना आणि कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त पन्नास किलो साखर, ५ लिटर गोडतेल, २ किलो मिठाई आणि भेटवस्तू देण्याचा निर्णय झाला

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.